Parineeti Chopra Raghav Chadha : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) लग्नबंधनात अडकले असून आता त्यांनी लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये दोघे आनंदी दिसत असून त्यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. फोटो शेअर करत अभिनेत्रीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
उदयपूरमधील 'द लीला पॅलेस'मध्ये परिणीती आणि राघव यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. बॉलिवूडसह राजकीय मंडळी या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नववधू परिणीतीची लग्नानंतरची पहिली पोस्ट (Parineeti Chopra First Post After Wedding)
नववधू परिणीतीने लग्नसोहळ्यादरम्यानचे फोटो शेअर करत पहिली पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे,"नाश्त्याच्या टेबलावर पहिली भेट झाली. पहिल्या भेटीतच चांगली मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून आम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो. अखेर आता आम्ही मिस्टर आणि मिसेस झालो आहोत. आम्ही एकमेकांशिवाय आयुष्य जगू शकत नव्हतो. आता नव्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली आहे".
पहिली भेट ते लगीनगाठपर्यंतचा प्रवास सांगणारी परिणीतीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अल्पावधीतच परिणीतीच्या या पोस्टला हजारो लाईक्स मिळाले आहेत. सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेट्स करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. रब ने बना दी जोडी, खूप-खूप प्रेम, पुढील प्रवासासाठी दोघांनाही शुभेच्छा, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
परिणीतीने लग्नसोहळ्यात सेलिब्रिटी फॅशन डिझायनकर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला लेहेंगा परिधान केला होता. तर राघव चड्ढा यांनी त्यांच्या मामाने अर्थात फॅशन डिझायनर पवन सचदेवा यांनी डिझाइन केलेला आऊटफिट परिधान केला होता. पेस्टल रंगाच्या आऊटफिटमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत आहे.
परिणीती आणि राघव यांनी पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न केलं आहे. साखरपुडा झाल्यापासून चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. आता ते लग्नबंधनात अडकल्याने चाहतेदेखील आनंद व्यक्त करत आहेत.
संबंधित बातम्या