Satyashodhak Marathi Movie : आज समाजातील महिला वेगवेगळ्या उच्च पदांवर बेधडकपणे काम करतात. याचं सर्व श्रेय क्रांतीज्योती ज्योतिराव फुले (Krantijyoti Jyotiba Phule) आणि सावित्रीमाई (Savitribai Phule) यांनाच जातं. त्यांच्या जीवनावर आधारित 'सत्यशोधक' (Satyashodhak) या सिनेमाचा टीझर आज आऊट करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या विशेष उपस्थितीत या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.


'सत्यशोधक' या सिनेमात ज्योतिरावांच्या प्रमुख भूमिकेत संदीप कुलकर्णी (Sandeep Kulkarni) दिसतील. संभाजी ब्रिगेड-भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सत्यशोधक संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने संमेलनात ‘सत्यशोधक’ या चित्रपटाचे टीझर लॉन्च करण्यात आले. या संमलेनाचे उद्घाटक शरद पवार यांच्या हस्ते हा टीझर आऊट करण्यात आला आहे.






‘विद्येविना मती गेली, मतिविना निती गेली...’ अशा कठोर शब्दांत शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या ज्योतिरावांच्या आयुष्यातील संघर्ष आता रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या दिवाळीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येईल. अभिनेते संदीप कुलकर्णींसह राजश्री देशपांडे, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी ही कलाकार मंडळी सिनेमात झळकतील.


'सत्यशोधक' या टीझर लॉन्च सोहळ्याला वामन मेश्राम, प्रवीण गायकवाड, बाबा आढाव, मा. म. देशमुख, आ. रोहित पवार, व्ही. व्ही. जाधव, अॅड. वासंतीताई नलावडे, विठ्ठलदादा सातव, डॉ. जे. के. पवार उपस्थित होते. जन्मापासून मरणापर्यंत कुठलंही कर्मकांड नसलेला अशा शुद्ध विधींचा असा एक नवा धर्म म्हणजे 'सत्यशोधक' धर्म...क्रांतीची मशाल घेऊन येत आहेत समाज उजळायला 'सत्यशोधक' यंदा दिवाळीत तुमच्या जवळच्या सिनेमागृहात, असं म्हणत या सिनेमाचा टीझर आऊट करण्यात आला आहे.


दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'सत्यशोधक'


समता फिल्म्स प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित 'सत्यशोधक' सिनेमाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूर वाघ हे आहेत. तर सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे,प्रतिका बनसोडे आणि प्रमोद काळे हे आहेत. महेश भारंबे, शिवा बागुल हे कार्यकारी निर्माते आहेत. ‘सत्यशोधक’ हा सिनेमा येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येईल.


संबंधित बातम्या


महात्मा जोतीराव फुलेंचा 'सत्यशोधक' लकवरच रुपेरी पडद्यावर