Al Pacino Fourth Time Father At 83 Age: हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अल पचीनो (Al Pacino) आणि त्याची  गर्लफ्रेंड नूर अलफल्लाह (Noor Alfallah) यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्याचं आगमन होणार आहे. नूर ही  प्रेग्नंट  आहे.  द गॉडफादर फेम अभिनेता अल पचीनोची गर्लफ्रेंड नूर अलफल्लाह हिच्याबाबत अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात नूरबाबत...


नूर ही एप्रिल 2022 पासून अल पचीनोला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. अल पचीनो आणि नूर ही जोडी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये व्हेनिसमधील फेलिक्स ट्रॅटोरिया येथे स्पॉट झाली होती, तेव्हा ते इटालियन हॉटेलमध्ये जेवल्यानंतर एकाच कारमधून निघताना दिसले होते. यावेळचे नूर आणि अल पचीनो यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 


कोण आहे नूर अलफल्लाह? 


एका रिपोर्टनुसार, नूर ही एका कुवेती अमेरिकन कुटुंबातील मुलगी आहे, यापूर्वी तिचं नाव 78 वर्षाचा गायक मिक जेगर आणि 60 वर्षाच्या निकोलस बर्गग्रेन यांच्याशी जोडले गेले होते. काही वर्षांपूर्वी ती 91 वर्षीय चित्रपट निर्माते क्लिंट ईस्टवुडसोबत स्पॉट झाली होती, याबाबत तिनं सांगितलं होतं की, क्लिंट हा तिचा फक्त एक  मित्र होता. नूरनं काही दिवसांपूर्वी अल पचीनोसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. 






अल पचीनो चौथ्यांदा होणार बाप


अल पचीनो आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड जॉन टेरंट यांना  ज्युली नावाची मुलगी आहे.  ज्युली ही 33 वर्षाची आहे.1997 ते 2003 या काळात अल पचीनोनं बेव्हरली डी'एंजेलोला डेट केलं. बेव्हरली डी'एंजेलो आणि अल पचीनो यांना अँटोन आणि ऑलिव्हिया ही जुळी मुलं आहेत. या मुलांचे वय 22 वर्ष आहे. आता अल पचीनो हा चौथ्यांदा बाप होत आहे.


अल पचीनोने 'स्कारफेस', 'सेंट ऑफ अ वुमन', 'हीट', 'सर्पिको', 'सी ऑफ लव्ह', 'द डेव्हिल्स अॅडव्होकेट', 'द इनसाइडर' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्याच्या  'वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवूड', 'द आयरिशमन', 'हाऊस ऑफ गुच्ची', 'द पायरेट्स ऑफ सोमालिया', 'डॅनी कॉलिन्स' या चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


इतर महत्वाच्या बातम्या:


 Al Pacino: वयाच्या 83 व्या वर्षी चौथ्यांदा बाप होणार 'हा' अभिनेता; 29 वर्षाची गर्लफ्रेंड आहे प्रेग्नंट