KGF 2 : यशचा (Yash) 'केजीएफ 2' (Kgf 2) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आता प्रशांत नील दिग्दर्शित 'केजीएफ 2' हा सिनेमा पाहताना सिनेमागृहात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास घेत आहेत.
सिनेमा पाहताना तरुणाला मारली गोळी
सिनेमागृहात तरुणाला गोळी मारल्याची घटना याआधीदेखील घडली आहे. 27 वर्षीय तरुण सिनेमागृहातील नियमांचे पालन करत नसल्याने त्याला रागाच्या भरात सिनेमागृहात गोळी मारण्यात आली. लगेचच रुग्णालयात नेल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे.
बॉक्स ऑफिसवर 'केजीएफ 2'चा धुमाकूळ
'केजीएफ 2' सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. यश, संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. आतापर्यंत या सिनेमा 1200 कोटींची कमाई केली आहे. 14 एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
संबंधित बातम्या