कंगना राणावत अजूनही ड्रायव्हिंग लायसन्सच्या प्रतिक्षेत
एबीपी माझा वेब टीम | 02 Aug 2016 12:27 PM (IST)
मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतला मुंबईमध्ये ड्रायव्हिंग लायसन मिळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तिने कागदपत्रांची पूर्तता न केल्याने अद्याप वाहतूक शाखेकडून ड्रायव्हिंग लायसन देण्यात आले नाही. कंगना राणावतने मुंबई आरटीओकडे एका पत्राद्वारे आपले ड्रायव्हिंग लायसन हिमाचल प्रदेशचे असून, ते ट्रान्सफर करून महाराष्ट्राचे मिळावे अशी मागणी केली होती. बॉलीवूड हंगामा डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, आरटीओने कागदपत्रांची पूर्तता न केल्याने, तिला ड्रायव्हिंग लायसन दिले नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कंगनाला तिची योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय, ड्रायव्हिंग लायसन मिळणे अवघड झाले आहे. दरम्यान, कंगनाच्या प्रवक्त्याने या वृत्ताचे खंडन केले असून, आरटीओकडून अशा कोणत्याही कागदपत्रांची मागणी केली नसल्याचे सांगितले आहे. पण, जेव्हा आरटीओ शाखेकडून मागणी केल्यास त्याची पूर्तता करू, असेही त्याने स्पष्ट केले.