मराठमोळ्या भरत जाधवची भारदस्त मर्सिडीज!
एबीपी माझा वेब टीम | 02 Aug 2016 07:45 AM (IST)
मुंबई : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा मराठमोळा अभिनेता भरत जाधवने नुकतीच मर्सिडीज एस क्लास ही नवी कोरी आलिशान कार खरेदी केली आहे. भरतने फेसबुक आणि ट्विटरवर त्याच्या कारचा फोटो पोस्ट केला आहे. मर्सिडीज बेन्झ एस क्लास या कारची किंमत 1.16 कोटींपासून सुरुवात होते. महत्त्वाचं म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:ची व्हॅनिटी व्हॅन घेण्याचा मानही भरत जाधवच्या नावावर जमा आहे. दरम्यान, बॉलिवूड कलाकार म्हणजे भरपूर मानधन, ग्लॅमर, त्यामुळे त्यांच्याकडे आलिशान गाड्या असणं ही सामान्य बाब बनली होती. त्याउलट मराठी कलाकार म्हणजे गरीब, कमी मानधन मिळणार, टॅक्सीने येणारा, ग्लॅमर नसलेला. मात्र मागील काळात भरत जाधव, स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी यांनी हा समज खोडून काढला. आता त्याच्या दारातही महागड्या आणि आलिशान कार दिसतात.