मुंबई : पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारींना मुंबईत क्वारंटाईन करण्यात आल्यानंतर बिहारच्या पोलीस महासंचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विनय तिवारींना एअरपोर्टवरच क्वारंटाईन का करण्यात आलं नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय? या सर्व प्रकरणावर त्यांनी दुपारी तातडीची बैठक बोलावली होती. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा बिहार विधानसभेतही गाजला. आमदार नीरज सिंह बबूल यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केलीय. नीरज सिंह हे सुशांतसिंह राजपूतचे चुलत भाऊ आहेत. राजदचे आमदार तेजस्वी यादव यांनी नीरज सिंह यांच्या मागणीला समर्थन दिलंय.


सुशांतसिंह चौकशी प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय..मुंबई पोलीस या घटनेचा सखोल तपास करतील असा विश्वास असल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी व्यक्त केलीय. मात्र रोहीत पवार यांचे चुलत बंधू, म्हणजेच अजित पवारांचे सुपुत्र पार्थ यांनी सुशांत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळं पवार ब्रदर्समध्ये एकाच मुद्यावर मतभेद आहेत का असा सवाल आता विचारला जातोय.


सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण तपासावर शंका उपस्थित केली जात असताना त्यात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेतलीय. मुंबई पोलिसांच्या तपासावर फडणवीस यांनी ट्विटरमधून सवाल उपस्थित केलेत. हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं जातंय त्यामुळे मुंबईनं माणुसकी हरवलीय असं फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. तसंच मुंबई आता सामान्यांना जगण्यासाठी असुरक्षित झाल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलंय


पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारींना मुंबईत क्वारंटाईन करण्यात आल्यानंतर बिहारच्या पोलीस महासंचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विनय तिवारींना एअरपोर्टवरच क्वारंटाईन का करण्यात आलं नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय? या सर्व प्रकरणावर त्यांनी दुपारी तातडीची बैठक बोलावली होती.


बिहार पोलिस प्रश्न ज्या विमानानं विनय तिवारी मुंबईत आले. त्या विमानातल्या इतर प्रवाशांना क्वारंटाईन का केलं नाही? विनय तिवारी मुंबईत येणार आहे याची कल्पना दिली होती, तेव्हा क्वारंटाईनबद्दल कल्पना का दिली नाही?विनय तिवारी यांच्या हातावर मुंबई विमानतळावरच क्वारंटाईनचा शिक्का का मारण्यात आला नाही?


सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता पाटणा पोलीस विरुद्ध मुंबई पोलिसांपुरता मर्यादीत राहिलेला नाही. तर याला आता हळूहळू नितीश कुमारांचं बिहार सरकारविरुद्ध ठाकरेंचं महाराष्ट्र सरकार असा रंग येऊ लागलाय. सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी पाटण्याहून आलेले आयपीएस अधिकारी, विनय तिवारींना मुंबई पालिकेनं क्वारंटाईन केलंय. महाराष्ट्र सरकारच्या या भूमिकेवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. विनय तिवारींसोबत जे झालं ते योग्य नाही अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केलीय. तर नितीश कुमार सरकारमधले मंत्री संजय झा यांनी महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.