मुंबई : राजीव गांधींच्या तथाकथित आयलंड पार्टीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सवाल विचारला. राजीव गांधींनी आयएनएस विराटचा वापर 'पर्सनल टॅक्सी'सारखा केल्याचा घणाघाती आरोप केला आणि काँग्रेसच्या तथाकथित विलासी आयुष्यावर चौफेर टीका सुरु झाली. पण राजीव गांधी यांच्यावरील आरोपांना काँग्रेसने 'राजीव' भाटियाचा अर्थात अक्षय कुमारचा फोटो पोस्ट करुन सव्याज परतफेड केली. काँग्रेस नेत्या दिव्या स्पंदना यांनी ट्विटरवर फोटो पोस्ट करुन, "हे योग्य होतं का? मोदी तुम्ही कॅनडाचा नागरिक अक्षय कुमारला आपल्यासोबत आयएनएस सुमित्रावर घेऊन गेला होता," असा सवाल उपस्थित केला आहे.

दिल्लीतील रामलीला मैदानावरील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी आरोप केला होता की, 1987 मध्ये पंतप्रधान असताना राजीव गांधी यांनी आयएनएस विक्रांतचा पर्सनल टॅक्सीप्रमाणे वापर केला होता. राजीव गांधींनी आपल्या इटालियन सासरच्या मंडळींना आयएनएस विराटवर घेऊन तिचा अपमान केला.

राजीव गांधी युद्धनौकेवरुन कुटुंबासह सुट्ट्यांवर जायचे, मोदींचा 'विराट'हल्ला

2016 मध्ये आयएनएस सुमित्रावर अक्षय कुमार
अक्षय कुमारचे आयएनएस सुमित्रावरचे फोटो पोस्ट करुन दिव्या स्पंदना यांनी ट्वीट केलं आहे की, "हे योग्य होतं? कॅनडाचा नागरिक असलेल्या अक्षय कुमारला तुम्ही आयएनएस सुमित्रावर घेऊन गेला होता. आपल्या दाव्याला दुजोरा देण्यासाठी दिव्या स्पंदना यांनी एका लेखाचीही लिंक दिली आहे, ज्यात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आयएनएस सुमित्रावर कसा पोहोचला, असा प्रश्न विचारला होता.


भारताचं सर्वात मोठं लष्करी प्रदर्शन
फेब्रुवारी 2016 मध्ये विशाखापट्टणममधील इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू या लष्करी प्रादर्शनात वरिष्ठ अधिकारी आणि व्हीव्हीआयपींसह अभिनेता अक्षय कुमारने मुलगा आर्यनसोबत हजेरी लावली होती. 15 वर्षांतील हे भारताचं सर्वात मोठं लष्करी शक्तीप्रदर्शन होतं. यावेळी भारताची आयएनएस सुमित्रा ही युद्धनौका आयएफआरमध्ये सहभागी झाली होती.

निवृत्तीनंतर मी कॅनडामध्ये स्थायिक होणार, अक्षय कुमारचा जुना व्हिडीओ व्हायरल

राजीव गांधींनी युद्धनौकेचा अपमान केला
दिल्लीतील सभेत नरेंद्र मोदी 8 मे रोजी म्हणाले होते की, "गांधी कुटुंबाने आयएनएस विराटचा पर्सनल टॅक्सीप्रमाणे वापर केला होता, युद्धनौकेचा अपमान केला होता. राजीव गांधी पंतप्रधान असतानाची ही गोष्ट आहे. एका बेटावर सुट्टी साजरी करण्यासाठी युद्धनौकेचा दहा दिवस वापर केला होता. बेटावरील सर्व व्यवस्थेची जबाबदारी सरकार आणि नौदलावर सोपवली होती. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सासरची मंडळीही होती. काँग्रेसच्या या कुटुंबाने जनपथलाही दलालपथ बनवलं." पंतप्रधान मोदी 1987 मधील  राजीव गांधी यांच्या 1987 मधील लक्षद्वीपमधील एका बेटाच्या प्रवासाचा उल्लेख करत होते.

तो सरकारी दौरा होता : माजी नौदल अधिकारी
पण राजीव गांधी यांचा लक्षद्वीप दौरा हा सरकारी कामकाजाचा भाग असल्याचं जाहीर करुन माजी नौदल अधिकाऱ्यांनी नरेंद्र मोदींनाच खोटं पाडलं. माजी नौदल प्रमुख अॅडमिरल एल रामदास यांनी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे. राजीव गांधींच्या लक्षद्वीप भेटीदरम्यान एल रामदास हे दक्षिण विभागाचे प्रमुख होते. "ज्या घटनेचा उल्लेख राजीव गांधी कुटुंबीयांसोबत सुट्टीसाठी गेले होते, असा केला जात आहे, खरंतर तो त्यांचा सरकारी दौरा होता. ते तिथे लाडू-पेढे वाटायला गेले नव्हते. राजीव गांधी यांच्यासोबत आयएनएस विराटवर कोणताही परदेशी नागरिक नव्हता," असं एल रामदास यांनी सांगितलं.


तर राजीव गांधींचा आयएनएस विराटचा प्रवास सरकारी होता. ही कोणत्याही प्रकारची पिकनिक नव्हती, असा दावा व्हाईस अॅडमिरल विनोद पसरिचा यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

कॅनडियन नागरिक अक्षय कुमारकडून राष्ट्रीय पुरस्कार परत घेतला जाणार?

देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही, कॅनेडियन नागरिकत्त्वाच्या वादावर अक्षय कुमारनं मौन सोडलं