...म्हणून राखी सावंतने पाकिस्तानी झेंड्यासोबत फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले
एबीपी माझा वेब टीम | 09 May 2019 01:08 PM (IST)
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखीने पाकिस्तानी झेंड्यासोबतचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नवी दिल्ली : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखीने पाकिस्तानी झेंड्यासोबतचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिचे चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. राखीने अपलोड केलेल्या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, मला माझा भारत देश खूप प्रिय आहे. हा फोटो माझा आगामी चित्रपट 'धारा 370' मधील लोकेशनवरचा आहे. तरिदेखील तिचे चाहते तिच्यावर नाराज आहेत. या फोटोनंतर अनेकांनी तिला पाकिस्तानला जाण्याचा सल्लादेखील देऊन टाकला. वाचा : नवरी नटली, राखी सावंतकडून लग्नाची पत्रिका शेअर राखीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केल्यानंतर तिेने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, "हाय फ्रेंड्स, हा एक पाकिस्तानी सेटअप आहे. 'धारा 370' असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट काश्मीरी पंडितांवर आधारित आहे." राखीने म्हटले आहे की, "मी या चित्रपटात एका पाकिस्तानी तरुणीची भूमिका करत आहे. तुम्ही माझे कपडे पाहू शकता, या चित्रपटात लहान मुलांना जिहादी बनवणाऱ्या दहशतवादी संघटनांचा भांडाफोड करणाऱ्या तरुणीची भूमिका मी करत आहे." पाहा राखीने काय उत्तर दिलंय?