मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या प्रेमकहाणीचा अंत मागील वर्षीच झाला. पण अंकिता आता टीव्ही स्टार कुशाल टंडनसोबत दिसते. त्यामुळे दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय याची चर्चा रंगली आहे.

अंकिता-सुशांत या जोडीच्या ब्रेकअपमुळे सर्वाधिक दु:ख त्यांच्या चाहत्यांना झालं होतं. ब्रेकअपनंतर सुशांत सिंह राजपूतचा राबता हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सुशांतचं नाव त्याची को-स्टार कृती सेसनसोबत जोडलं जात आहे. तर दुसरीकडे अंकिता आणि कुशल यांच्यात जवळीच वाढल्याचं म्हटलं जात आहे.

कुशल टंडन आणि अंकिता लोखंडे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फोटो पाहून असंच वाटतं की दोघांमधील मैत्री अतिशय खास झाली आहे. दोघांनी फोटो तसंच व्हिडीओ पण शेअर केले आहेत. दोघेही एकमेकांसोबत कम्फर्टेबल असल्याचं फोटोंवरुन दिसतं.



अंकिताना कुशलसोबतचा फोटो शेअर करुन अचानक झालेली मैत्री बेस्ट असते, असं लिहिलं आहे. तर कुशलने इन्स्टाग्रामवर अंकितासोबतचा फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, "अंकिता लोखंडेचा डान्स अस्तित्वाचा आनंद आहे.