जेव्हा, बॉलिवूडच्या खिलाडी कुमारनं अंडरटेकरला उचलण्याच्या नादात कंबरडच मोडून घेतलेलं; अक्षय कुमारसोबत नेमकं काय घडलेलं?

Akshay Kuamr Kissa: अक्षय कुमारला त्याचे चाहते खिलाडी या नावानं ओळखतात. बॉलिवूडचा लाडका खिलाडी कुमार अप्रतिम शरीरयष्टी आणि एनर्जीनं स्टंटनं धमाकेदार फाईट सीन्स देतो.

Akshay Kuamr Kissa

1/11
पण एकदा हा फिटनेस आणि स्टंट खिलाडी कुमारवर भारी पडला होता.
2/11
अक्षय कुमार आपल्या अभिनयासोबतच, त्याच्या पडद्यावर दिसणाऱ्या एनर्जीमुळे, चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
3/11
अक्षय कुमार स्टंटच्या बाबतीत कोणतंही आव्हान स्विकारण्यास तयार आहे. अशीच एक घटना आहे, जेव्हा अक्षय कुमारचं WWE चा प्रसिद्ध रेसलर अंडरटेकरसोबत भांडण झालं होतं.
4/11
दोघांमध्ये भांडण का झालं आणि मग त्याचे परिणाम नेमके काय झाले? याचा एक उत्तम किस्सा सांगणार आहोत.
5/11
खरं तर, ही घटना अक्षय कुमारच्या 'खिलाडी' या सुपरहिट चित्रपटादरम्यान घडली होती. खुद्द अक्षय कुमारनं एका मुलाखतीत बोलताना याचा उल्लेख केला होता. अक्षय स्वतःचे स्टंट करतो आणि या चित्रपटातही त्यानं अनेक धोकादायक स्टंट केले आहेत.
6/11
अक्षय कुमार सांगतो की, अंडरटेकरसोबत स्टंट करण्यासाठी तो फारच उत्सुक होता. या चित्रपटात त्यानं अंडरटेकरसोबत फाईट स्टंटही केला होता. पण, त्यावेळी त्याचा स्टंट त्याच्यावर भारी पडला होता. खिलाडी कुमारचं कंबरडं मोडता मोडता राहिलं होतं. यावेळी त्याला स्लिप्ड डिस्कचा त्रास झाला होता.
7/11
द रणवीर शो दरम्यान, अक्षय कुमारनं हे सांगितलं होतं की, या चित्रपटात खिलाडी कुमारला एका फाईट सीन दरम्यान अंडरटेकरशी लढायचं होतं. या दरम्यान मी अंडरटेकरला माझ्या पाठीवर उचललं होतं. ज्यानंतर माझी परिस्थिती खरंच खूप खराब झाली होती.
8/11
अक्षय कुमार म्हणतो की, मला आठवतंय आणि माझ्या कंबरेलाही आठवतंय. मी त्याला उचललं होतं आणि माझं कंबरडं मोडलेलं. मी वेडा होतो की, मी त्याला उचललं. त्याचं वजन साडेचारशे पौंड होतं. पण मी त्याच्याकडे बघितलं आणि हो मी सहज उचलीन असं म्हणालो.
9/11
अक्षय सांगतो की, सर्व काही ठीक झालं, मी ते उचललं आणि सीन शूट झाला. तीन दिवसांनंतर, त्यानं काहीतरी कठोरपणे सांगितलं आणि मला कळलं की, माझ्या कंबरेला काहीतरी झालं... डिस्क स्लिप झाली. मात्र, उपचारानंतर तो आता पूर्णपणे बरा झाला आहे.
10/11
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अक्षय कुमार नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सिंघम अगेन' या चित्रपटात अजय देवगण आणि करीना कपूरसोबत दिसला होता.
11/11
आता या अभिनेत्याकडे 'गोलमाल 5' आणि 'जॉलीएलएलबी 3' सारखे अनेक मोठे चित्रपट आहेत.
Sponsored Links by Taboola