Why : 'वाय' (Why) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सत्य घटनांवर आधारित सिनेमा असणार आहे. कल्पनेपलिकडील वास्तवाची 'ती' च्या लढ्याची गोष्ट 'वाय' सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अजित वाडीतरने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुसा सांभाळली आहे. या सिनेमात मुक्ता बर्वे (Mukta Barve) मुख्य भूमिकेत आहे. 


सध्या सोशल मीडियावर हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या मुक्ता बर्वेसह स्वप्निल जोशी, नीना कुळकर्णी, प्राजक्ता माळी यांनीदेखील 'वाय' सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या सर्वच कलाकारांनी  " माझा पाठिंबा आहे !  आपला ... ? " अशी विचारणा चाहत्यांना केल्यामुळे , चाहत्यांमध्येही 'वाय' या नावाबद्दल आणि सिनेमाबद्दल उत्कंठा निर्माण झाली आहे. 


हे सर्व कलाकार 'वाय' या सिनेमामध्ये आहेत की यातील मोजकेच कलाकार आहेत 'वाय' या सिनेमात असणार आहेत की आणखी यापेक्षा वेगळेच कलाकार सिनेमात असतील हे अद्याप गुलदस्त्यात आहे. शिवाय या पोस्टरमागचा अर्थ आणि नेमका उद्देश काय, याविषयीही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे आता 'वाय' विषयाची प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.





अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणाली, 'वाय' चा अर्थ काय हे सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना कळेल. 'वाय' हे केवळ एक अक्षर नसून त्यामागे स्त्रीचा माणूस म्हणून जगण्याचा लढा आहे." 'वाय' चे दिग्दर्शक अजित वाडीकर म्हणाले,'वाय' या अक्षरामागे मोठा संघर्ष दडलेला आहे. हाच संघर्ष प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही 'वाय' मधून करत आहोत आणि यात आम्हाला मराठी सिनेसृष्टीची साथ मिळत आहे, ही आमच्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे.'' 


कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित वास्तवाचा थरार दाखवणारा आणि कल्पनेच्या पलीकडील 'ती' च्या लढ्याची गोष्ठ सांगणारा 'वाय' हा सिनेमा 24 जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या 'वाय' सिनेमाच्या पोस्टरमध्ये मुक्ताच्या संघर्षपूर्ण डोळ्यांत खंबीरपणे लढण्याची ताकद दिसत असून आजुबाजूला आगीचे लोळ दिसत होते. तर लाल रंगाच्या 'वाय' मध्ये ग्लोव्हस घातलेले हात वैद्यकीय हत्यार हाताळताना दिसत होते. पोस्टरवरून हा सिनेमा महत्वपूर्ण विषयावर भाष्य करणारा आहे असे दिसत आहे.


संबंधित बातम्या


Why : सत्य घटनांवर आधारित 'वाय' लवकरच होणार प्रदर्शित, मुक्ता बर्वे प्रमुख भूमिकेत


Dharmaveer : एका धगधगत्या अग्निकुंडाची चरित्रगाथा! 'धर्मवीर'ने पहिल्याच दिवशी केली तब्बल 2.5 कोटींची कमाई


The Archies Poster : 'द आर्चीज'चं पोस्टर प्रदर्शित; सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण