मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने राजेश खन्ना-नसिरुद्दीन शाह वादावर मौन सोडलं आहे. "नसिरुद्दीन शाह यांनी आपल्या दिवंगत सासऱ्यांबद्दल जे बोलले त्यावर आपल्याला काही भाष्य करायचे नाही, त्यांनी माफी मागितल्यामुळे यावर बोलणे योग्य होणार नाही", अशी प्रतिक्रिया अक्षयने दिली आहे.
राजेश खन्ना वादावर अक्षय कुमारला विचारले असता अक्षयने हा मुद्दा संपल्याचे सांगितले. "नसिरुद्दीन शाह यांनी माफी मागितल्याने हा विषय संपला आहे. आता यावर काही बोलणे योग्य नसून हा विषय मागे पडला आहे. त्यामुळे माझ्याकडे मीडियाला सांगण्यासाठी काही नाही," असंही तो म्हणाला.
राजेश खन्ना 70च्या दशकातील कमी दर्जाचे अभिनेता असल्याचं नसिरुद्दीन शाह म्हणाले होते. तसेच त्यांनी खूप सामान्य चित्रपट केले आहेत, असंही म्हटलं होतं. पण यावर बोलताना अक्षय म्हणाला की, "सिनेमा जगताला एकत्र राहू द्या, जेव्हा कोणी माफी मागतो तेव्हा मनाचा मोठेपणा दाखवत वाद मिटवला पाहिजे".