मुंबई: अभिनेता संजय दत्तने नुकत्याच दिलेल्या प्रतिक्रीयेमध्ये मुन्नाभाई सिरीजमधील तिसरा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, विधू विनोद चोप्रासोबतच्या माझ्या आगामी चित्रपटाचं शुटिंग नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. त्यानंतर महेश मांजरेकरचा मराठी चित्रपट दे धक्काचा हिंदी रिमेक करणार आहे.

 

चित्रपटाच्या वेळेबाबत विचारले असता, याचे उत्तर राजकुमार हिरानी आणि विनोद देतील असे स्पष्ट केले.

 

मुन्नाभाईमध्ये सर्किटची भूमिका साकारणारा अरशद वारसी याने संजयवर सुरु असलेल्या बायोपिकमुळे या चित्रपटाच्या चित्रिकरणाला वेळ होत असल्याचे सांगितले होते. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिका साकरत आहे. याचे शुटिंग जूनपासून सुरु होणार होते. मात्र, अद्याप याचे शुटिंगच सुरु न झाल्याने इतर चित्रपटांच्या चित्रिकरणाला वेळ होत असल्याचे त्याने सांगितले.

 

दरम्यान, संजयवरील बायोपिकसंदर्भात त्यालाच विचारले असता, त्याने या चित्रपटात मी अभिनय करणार नसल्याचे स्पष्ट केले. हा चित्रपट येत्या फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही त्याने सांगितले.