राधिका आपटेच्या 'पार्च्ड'चा ट्रेलर रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 12 Sep 2016 06:15 PM (IST)
नवी दिल्लीः अभिनेत्री राधिका आपटे, सुरवीन चावला आणि तनिष्ठा चॅटर्जी यांच्या आगामी पार्च्ड या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात एका खेडे गावातील तीन महिलांच्या संघर्षाची कहानी दाखवण्यात आली आहे. महिला गावातील परंपरा तोडण्यासाठी कशा झटतात, ते या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. भारतातील महिलांच्या समस्यांवर या सिनेमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. या सिनेमात आदिल हुसैन यांचीही भूमिका आहे. अभिनेता अजय देवगनने या सिनेमाची सहनिर्मिती केली आहे. 23 सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अनेक देशांत आतापर्यंत हा सिनेमा रिलीज झाला असून विविध 18 पुरस्कार या सिनेमाने पटकावले आहेत. पाहा व्हिडिओः