यानंतर पालिकेनेही अधिक शहानिशा केल्यानंतर कपिल शर्माचेच पितळ उघडे पडले. यानंतर कपिलवर आपल्या त्या ट्वीटवरूवन सारवासारव करण्याची वेळ आली. पालिका प्रशासनाने कपिलला अवैध बांधकामासंदर्भात नोटीस बजावली होती.
पण कपिलच्या एका ट्वीटमुळे पालिकेच्या भ्रष्ट कारभाराचे बाभाडे यानिमित्ताने बाहेर आले होते. त्याने पंतप्रधानांच्या नावे ट्वीट करताना 'हेच का ते अच्छे दिन?' असा सवाल उपस्थित केला होता. पण कपिलच्या या ट्वीटला पंतप्रधान मोदींनी एक महिन्यापूर्वीच होते. यासंबंधातील कपिलला उत्तर दिलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होतो आहे.
या व्हिडीओत ऑगस्ट महिन्यातील माय गव्हर्नमेंट या कार्यक्रमातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा बखुबीने वापर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 6 ऑगस्ट रोजी माय गव्हर्नमेंट या आपल्या कार्यक्रमात बोलताना, काही ओपिनियन मेकर स्थानिक पातळीपासून ते राज्य पातळीवर कुठेही काही घडले तर, त्याला पंतप्रधानांना दोषी धरल्याबद्दल प्रत्युत्तर दिले होते. यामुळे गव्हर्नन्सला कशाप्रकारे नुकसान पोहचू शकते याची माहिती दिली होती.
भाषातील हाच भाग वापरून एक व्हिडीओ बनवण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्कींग साऊट यूट्यूबवरून कमालीचा व्हायरल होतो आहे. यूट्यूबवर या व्हिडीओला दोनच दिवसात दोन लाखाहूनही जास्त लोकांनी पाहिले आहे.
पाहा व्हिडीओ