मुंबई : मुंबईच्या रस्त्यावर एक भिकारी हार्मोनियम वाजवून गाणं गाताना दिसला. त्याचं गाणं ऐकून तिथे एकच गर्दी झाली. लोक त्याच्या सुरेल आवाजाला आणि गाण्याला दाद देत होत. त्यानंतर तो भिकारी तिथून त्याचं सामान आवरुन उठला आणि निघाला. पण या भिकाऱ्याची खरी ओळख समजली तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.


 

खरंतर मुंबईत रस्त्यावर भिकारीच्या वेशात गाणारा दुसरा-तिसरा कोणीही नसून प्रसिद्ध गायक सोनू निगम होता. त्याने 'कल हो ना हो' सिनेमातील हर घडी बदल रही है हे गाणं गायलं. गाणाऱ्या भिकाऱ्याचा सुरेल गळा ऐकण्यासाठी तिथे जमलेल्या कोणालाही त्याला ओळखता आलं नाही. यावेळी एका तरुणाने त्याच्याशी हात मिळवला आणि विचारलं, "अंकल आपने नाश्ता किया या नहीं?"

 

बीईंग इंडियाच्या 'रोडसाइड उस्ताद' नावाने पोस्ट केलेल्या या व्हिडीओच्या शेवटी सोनू निगमने सांगितलं की, "हा अनुभव मी कधीही विसरणार नाही. ज्या तरुणाने नाश्त्याचं विचारलं होतं, त्याने मला हळूच 12 रुपये दिले होते. ही माझ्या आयुष्यातील अमूल्य कमाई आहे. हे 12 रुपये मी माझ्या ऑफिसमध्ये फ्रेम करुन लावणार आहे."

 

पाहा सोनू निगमचं अनोखं रुप