आर्ची-परशा आता गुजराती-तेलुगूत, 'सैराट'चा लवकरच रिमेक
एबीपी माझा वेब टीम | 17 May 2016 10:55 AM (IST)
मुंबई : फक्त मराठीच नव्हे तर इतर भाषिक रसिकांच्याही पसंतीस उतरलेल्या सैराट चित्रपटाचा आता इतर भाषांमध्येही रिमेक होणार आहे. सैराटचा गुजराती आणि तेलुगू भाषेत रिमेक होणार असल्याची माहिती आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटातील आर्ची आणि परशा या मुख्य व्यक्तिरेखांसह सल्या, लंगड्या, आनी यांच्याही प्रेमात प्रेक्षक पडले होते. आता हेच आर्ची-परशा गुजराती आणि दाक्षिणात्य प्रेक्षकांनाही भुरळ पाडतील. सैराटच्या रिमेकमध्ये कोणते अभिनेता-अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार याबाबत उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटांच्या निर्मिती-दिग्दर्शनाची जबाबदारी कोण घेणार ही माहितीही गुलदस्त्यात आहे. चित्रपट निर्माते आणि वितरक गिरीश जोहर यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. मात्र या वृत्तामुळे सैराटच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. https://twitter.com/girishjohar/status/732441354790281216