National Cinema Day : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. पण आता या सिनेमासह 'स्पायडर मॅन' सारखे सिनेमे  येत्या 16 सप्टेंबरला प्रेक्षकांना 75 रुपयांत पाहायला मिळणार आहेत. 


16 सप्टेंबर हा दिवस 'राष्ट्रीय चित्रपट दिवस' (National Cinema Day) म्हणून साजरा केला होता. त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधत देशभरात सिनेमे 75 रुपयांत दाखवले जाणार आहेत. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने (MAI) यासंदर्भात घोषणा केली आहे. कोरोनामुळे सर्व सिनेमागृह दीड वर्ष बंद होती. त्यामुळे अनेक रसिक सिनेमा पाहण्यासाठी ओटीटीकडे वळाले. त्यामुळे आता या सिनेरसिकांना ओटीटीकडे वळवण्यासाठी एमएआयने तिकीटात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. 


देशभरात 4,000 सिनेमागृहांत 75 रुपयांत सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. पण ही ऑफर सिंगल स्क्रीन असलेल्या सिनेमागृहांसाठी वैध नाही. तर पीवीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवल, मिराज आणि सिटी प्राइड, एशियन, मुक्ता ए 2, मूवीटाइम, वेव, एम 2 के आणि डिलाइट सारख्या अनेक मल्टीप्लेक्ससाठी ही ऑफर लागू आहे. 


तिकीट बुक करण्याची पद्धत जाणून घ्या...


16 सप्टेंबरला 75 रुपयांत सिनेमा पाहता येणार आहे. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींत तिकीट बुक करता येणार आहे. पण ऑफलाईन तिकीट विकत घेताना प्रेक्षकांना 75 रुपये द्यावे लागणार आहेत. तर ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी 100 रुपये द्यावे लागणार आहेत. 75 ते 100 रुपयांत सिनेमा पाहायला मिळणार असल्याने सिनेमागृहात हाऊसफुल्लचा बोर्ड झळकणार आहे. 


75 रुपयांत 'हे' सिनेमे पाहायला मिळणार


सिनेप्रेमींना 'राष्ट्रीय चित्रपटदिनी' खास 75 रुपयांत सिनेमे पाहायला मिळणार आहेत. यात 'केजीएफ चॅप्टर 2', 'आरआरआर', 'विक्रम' या दाक्षिणात्य सिनेमांचा, 'भूल भुलैया 2' या बॉलिवूड सिनेमाचा आणि डॉक्टर स्ट्रेंज आणि टॉप गन : मेवरिक' या हॉलिवूड सिनेमांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांत या सिनेमांनी सिनेमागृहात धुमाकूळ घालत बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. 


संबंधित बातम्या


National Cinema Day : सिनेप्रेमींसाठी खुशखबर! 'राष्ट्रीय चित्रपटदिनी' सिनेमे पाहा फक्त 75 रुपयांत


Brahmastra Box Office Collection : 'ब्रम्हास्त्र' वीकेंडला पार करणार 100 कोटींचा टप्पा; रेकॉर्डब्रेक कमाई करण्यास सज्ज