लॉस एंजेलिस : तरुण असताना आपला ‘टॅक्सी ड्रायव्हर’ सिनेमा पाहण्याची मला स्वत:ला परवानगी नव्हती, असे हॉलिवूड अभिनेते जॉर्ज क्लूनी यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे.


 

‘पिपुल डॉट कॉम’ वेबसाईटच्या वृत्तानुसार, ज्यावेळी अभिनेत्री जुडी फोस्टरला ‘टॅक्सी ड्रायव्हर’ सिनेमासाठी ऑस्करसाठी नामांकन मिळालं होतं, त्यावेळी तिचं वय फक्त 13 वर्षे होतं आणि त्यावेळी क्लून यांचं वय फक्त 15 वर्षे होतं. म्हणजेच त्यावेळी क्लून यांनना आर-रेटेड सिनेमे पाहण्याची परवानगी नव्हती.

 

‘एन्टरटेन्मेंट विकली’च्या नव्या एडिशनला दिलेल्या मुलाखतीवेळी क्लूनी म्हणाले, “मला ‘टॅक्सी ड्रायव्हर’ सिनेमा पाहण्याची परवानगी नव्हती. सिनेमात काम करण्यची परवानगी होती, मात्र, सिनेमा पाहण्याची नव्हती.”

 

‘टॅक्सी ड्रायव्हर’ सिनेमा 1976 साली रिलीज झाला होता आणि त्यावेळच्या हिंसा आणि वादग्रस्त मुद्द्यांवर सिनेमाची कथा बेतलेली होती.