वीरप्पनच्या आयुष्यावरील सिनेमासाठी संशोधन करताना आपल्याला ही माहिती मिळाल्याचं राम गोपाल वर्माने म्हटलं आहे. वीरप्पनच्या सिनेमासाठी माहिती गोळा करताना त्याने वीरप्पनचे एकेकाळचे सहकारी, वीरप्पन आणि सरकार यांच्यातील चर्चेतील मध्यस्थ, तसंच वीरप्पनचा खातमा करण्याच्या मोहीमेतील काही अधिकारी यांच्याशीही चर्चा केली. त्यातूनच त्याला ही माहिती मिळाली.
वीरप्पनने कन्नड मेगास्टार राजकुमार यांचंही अपहरण केलं होतं. त्याच धर्तीवर त्याला रजनीकांतचं अपहरण करायचं होतं.
वीरप्पनने कन्नड स्टार राजकुमार याचं अपहरण केल्यानंतर संबंध देश हादरला होता. कर्नाटक चित्रपट उद्योगावरही त्याचा मोठा परिणाम झाला. तामिळनाडूमधील राजकुमार यांच्या एका फार्महाऊसवरुन वीरप्पनने त्याचं अपहरण केलं होतं. ते जवळपास 108 दिवस वीरप्पनच्या ताब्यात होते.
वीरप्पनचं आयुष्य अनेक नाट्यपूर्ण घटनांनी ओतप्रोत भरलेलं आहे. पण त्याला ठार करण्याचं मिशनही तेवढ्याच नाट्यपूर्ण घटनांनी भरलेलं आहे, असंही राम गोपाल वर्माने नमूद करतो.
राम गोपाल वर्माचा 'वीरप्पन' हा सिनेमा 27 मे रोजी देशभरात प्रदर्शित होत आहे.