पहिल्याच दिवशी 'वॉर'ने तब्बल 53.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबाबातची माहिती ट्विटरद्वारे जाहीर केली आहे. सर्वात मोठी ओपनिंग मिळवण्याचा विक्रम याआधी आमीर खान याच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाच्या नावावर होता. ठग्सने पहिल्याच दिवशी 50.75 कोटी रुपयांची कमाई केली होती.
'वॉर' चित्रपट तब्बल चार हजार चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ह्रतिक आणि टायगर ही गुरु-शिष्याची जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. चित्रपटाबद्दल समीक्षकांच्या समीश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
वॉर प्रेक्षकांना कसा वाटला? | मूव्ही रिव्ह्यू
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'वॉर'मध्ये हृतिक आणि टायगर यांच्यासह वाणी कपूर, आशुतोष राणा आणि अनुप्रिया गोएंका यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
WAR REVIEW | वॉर : हृतिक वि टायगर