मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉय लवकरच मराठी चित्रपटात दिसणार आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात स्वत: विवेक ओबेरॉयने याबाबत माहिती दिली.
“रितेश देशमुखने मला चित्रपटाची कथा ऐकवली आहे. ती कथा प्रचंड आवडली असून, रितेशला तातडीने होकारही कळवला आहे.”, अशी माहिती विवेकने दिली. शिवाय, कथेवर सध्या काम सुरु असल्याचंही विवेक म्हणाला.
रितेश देशमुखने सांगितल्यावर तातडीने शूटिंगला सुरु करणार असल्याचंही विवेक ओबेरॉयने सांगितले.
याआधीही हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, विवेक ओबेरॉय पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करणार आहे. त्यामुळे विवेकच्या चाहत्यांसोबत मराठी सिनेरसिकांनाही विवेकच्या मराठी चित्रपटाची उत्सुकता आहे.