मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांच्या 'रोबो 2' म्हणजेच '2.0' या सिनेमाचं फर्स्ट टीझर पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात अक्षय कुमार कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक 20 नोव्हेंबरला रिलीज करण्यात येईल.


https://twitter.com/superstarrajini/status/798865559899160577

सिनेमाचे निर्माते, अक्षय कुमार आणि रजनीकांत यांनी हे टीझर पोस्टर ट्विटरवर शेअर केलं आहे. 350 कोटी एवढ्या हायबजेट सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यासाठी सिनेनिर्माता करण जोहर उपस्थित राहणार आहे.

https://twitter.com/akshaykumar/status/798865766141612032

मुंबईतील यशराज स्टुडीओमध्ये 20 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता हा लॉन्चिंग सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला रजनीकांत, अक्षय कुमार, ए. आर. रेहमान यांच्यासह दिग्गजांची हजेरी असणार आहे.

रजनीकांतचा 2010 मधील ब्लॉकबस्टर सिनेमा 'रोबो'चा हा सिक्वेल आहे. 'रोबो'मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि रजनीकांत यांची मुख्य भूमिका होती. '2.0'  मध्ये अक्षय कुमार, एमी जॅक्सन आणि रजनीकांत तिघे मुख्य भूमिकेत असणार आहेत.