मुंबई : बॉलिवूडमधून गाशा गुंडाळलेला अभिनेता विवेक ओबेरॉय त्याच्या वादग्रस्त ट्वीट्समुळे सतत चर्चेत असतो. विवेकने पुन्हा एकदा एक ट्वीट करुन वाद ओढवून घेतला आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत 10 जुलै रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सेमीफायनलचा सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव केला.

या पराभवानंतर टीम इंडियासह सर्व भारतीय हळहळले. परंतु बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने मात्र याच पराभवावरुन एक गमतीदार GIF व्हिडीओ शेअर करत टीम इंडियाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु विवेकच्या या ट्वीटमुळे भारतीय चाहते त्याच्यावर संतापले आहेत.

विवेकने शेअर केलेल्या GIF व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका व्यक्तीला रस्त्याने जात असताना एक महिला त्याच्याकडे येत असल्याचा भास होतो. त्याला वाटते की ती महिला त्याला मिठी मारणार आहे. परंतु ती महिला त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभ्या असणाऱ्या माणसाला जाऊन मिठी मारते. विवेकने या व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, सेमीफायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान भारतीय चाहते आणि या व्हिडीओमधील व्यक्तीची अवस्था सारखीच आहे.


या ट्वीटनंतर भारतीय चाहत्यांनी विवेकला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
विवेकला ट्रोल करणारे काही मजेदार मीम्स पाहा




चोराच्या उलट्या बोंबा, विवेक ओबेरॉयकडून 'त्या' ट्वीटचं समर्थन | ABP Majha