चित्रपट समिक्षक तरण आदर्शने विवेकचे मोदींच्या भूमिकेत असलेले विविध नऊ लुक्स शेअर केले आहे. ज्यात मोदींचे तरुणपणापासून आतापर्यंतचे लुक्स आहेत. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघातील कार्यकर्ता आणि साधूच्या लुकमध्येही विवेकचा फोटो समोर आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्ष सन्यास घेत हिमालयावर घालवले होते. तो प्रसंग ही या चित्रपटात दाखवलं जाणार असल्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे मोदींच्या चित्रपटातील साधूच्या वेशात असलेला विवेकचा फोटो समोर आला आहे.
'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. येत्या 12 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मोदींच्या जीवनातील अशा घटनांना दाखवलं जाणार आहे जे लोकांना माहित नाही. उमंग कुमार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर संदीप सिंह, सुरेश ओबेरॉय आणि आनंद पंडित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
या चित्रपटात नरेंद्र मोदींच्या भूमिकेत अभिनेता विवेक ओबेरॉय दिसणार आहे. अभिनेते मनोज जोशी भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भूमिका करत आहेत. बरखा सेनगुप्ता ही अभिनेत्री चित्रपटात मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांची भूमिका करणार आहे. तर अभिनेत्री जरीना वाहब ही मोदींच्या आई हिराबेन यांची भूमिका साकारणार आहे.
संबंधित बातम्या
'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, 'या' दिवशी चित्रपट रिलीज होणार
'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात बोमन इराणी साकारणार रतन टाटा यांची भूमिका
मोदींच्या बायोपिकमध्ये अमित शाहांच्या भूमिकेतील 'या' अभिनेत्याला ओळखलंत?
नरेंद्र मोदींच्या बायोपिकमधील जशोदाबेन यांच्या व्यक्तिरेखेबाबतचा सस्पेन्स संपला, 'ही' अभिनेत्री मुख्य भूमिकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकचा फर्स्ट लूक रिलीज
नरेंद्र मोदींवर चित्रपट, विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत!