Dadasaheb Phalke Award 2023 : 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित झाला असला तरी आजही हा सिनेमा चर्चेत आहे. नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा (Dadasaheb Phalke Awards 2023) दिमाखात पार पडला असून या सोहळ्यात विवेक अग्निहोत्रींच्या (Vivek Agnihotri) 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे.
'द कश्मीर फाइल्स' या बहुचर्चित सिनेमाला दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे. विविके अग्निहोत्रींनी ट्वीट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे, "दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात 'द कश्मीर फाइल्स'नं सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारावर नाव कोरलं आहे. हा पुरस्कार काश्मिरी पंडित आणि आम्हाला आशीर्वाद दिलेल्या तुम्हा भारतीयांना समर्पित करतो".
'द कश्मीर फाइल्स'चा बोलबाला कायम
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमावर प्रचंड टीका झाली होती. पण तरीही वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या सिनेमात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि पल्ल्वी जोशी मुख्य भूमिकेत होते. या सिनेमत काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटणांचे वर्णन करण्यात आले होते. भारतात या सिनेमाने 252.90 कोटींची कमाई केली होती. तर जगभरात या सिनेमाने 340.92 कोटींची कमाई केली आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच 'आरआरआर' या सिनेमाला 'फिल्म ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रा आणि रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार शासनाकडून दिला जात नसून एका सामाजिक संस्थेकडून दिला जातो.
जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी...
- सर्वोत्कृष्ट सिनेमा - द कश्मीर फाइल्स
- फिल्म ऑफ द इयर - आरआरआर
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट
- सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणबीर कपूर
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) - वरुण धवन
- सर्वोत्कृष्ट प्रॉमिसिंग अभिनेता - ऋषभ शेट्टी
- अष्टपैलू अभिनेता - अनुपम खेर
- सर्वोत्कृष्ट वेबसीरिज - रुद्र
- सर्वोत्कृष्ट मालिका - अनुपमा
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मालिका विभाग - तेजस्वी प्रकाश)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (मालिका विभाग) - जैन इमाम
महत्त्वाच्या इतर बातम्या :