Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Swanandi Tikekar : स्वानंदी टिकेकरच्या होणाऱ्या नवऱ्याने गाजवलंय 'Indian Idol'; जाणून घ्या आशिष कुलकर्णीबद्दल...


Swanandi Tikekar Ashish Kulkarni : अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) सध्या चर्चेत आहे. स्वानंदीने 'आमचं ठरलं' असं म्हणत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. स्वानंदी लवकरच आशिष कुलकर्णीसोबत (Ashish Kulkarni) लग्नबंधनात अडकणार आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Marathi Serial : टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग'ने मारली बाजी


Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serials) विश्वात वेगवेगळे प्रयोग होत आहेत. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित


Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा आगामी भाग विशेष असणार आहे. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सुमित राघवन (Sumeet Raghavan) आणि चिन्मयी सुमित (Chinmayee Sumeet) हजेरी लावणार आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Prajakta Gaikwad : 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला पदवी परीक्षेत फर्स्ट क्लास; चाहते म्हणाले,"इंजिनिअर झाल्या येसूबाई"


Prajakta Gaikwad : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) सध्या चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' (Swarajya Rakshak Sambhaji) या मालिकेतील येसूबाईंच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या प्राजक्ताने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे. सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Baipan Bhaari Deva : 'सैराट' अन् 'वेड'च्या तोडीसतोड 'बाईपण भारी देवा'! लवकरच पार करणार 100 कोटींचा टप्पा


Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नागराज मंजुळेचा सैराट 'Sairat) आणि रितेश देशमुखच्या 'वेड'च्या (Ved) तोडीसतोड हा सिनेमा आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. आता हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा