Vivek Agnihotri On The Kashmir Files Unreported : 'द कश्मीर फाइल्स'च्या (The Kashmir Files) वादादरम्यान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' (The Kashmir Files Unreported) बनवणार असल्याची माहिती दिली आहे. 


53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच गोव्यात पार पडला. दरम्यान नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी 'द कश्मीर फाइल्स' सिनेमासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले,"द कश्मीर फाइल्स' या सिनेमाचा 'इफ्फी' सारख्या महोत्सवात समावेश होणं ही धक्कादायक बाब  आबे. तसेच हा सिनेमात प्रपोगंडा आणि वल्गर सिनेमा आहे". 


'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा नव्व्दच्या दशकात काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटणांचे वर्णन करणारा आहे. विवेक अग्निहोत्री यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आता 'द कश्मीर फाइल्स'च्या वादादरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी द कश्मीर फाइल्स'चा पुढचा भाग 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' बनवणार असल्याची घोषणा केली आहे.






'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' हा एक माहितीपट असणार आहे. 'द कश्मीर फाइल्स'ला विरोध झाल्यामुळे 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड'लादेखील विरोध होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड'मध्ये नेमकं काय असेल हे अद्याप समोर आलेलं नाही. 


सुपरहिट 'द कश्मीर फाइल्स'


'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा 11 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एकीकडे या सिनेमाला विरोध होत होता. तर दुसरीकडे कमाईच्या बाबतीत हा सिनेमा आघाडीवर होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामुळे 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' या सिनेमाचं कथानक काय असेल, हा सिनेमा कधी प्रदर्शित होईल, कोणते कलाकार असतील, हा सिनेमादेखील वादाच्या भोवऱ्यात अडकेल का?, असे अनेक प्रश्न आता सिनेरसिकांना पडले आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 


संबंधित बातम्या


The Kashmir Files: 'मी चॅलेंज करतो...'; द कश्मीर फाइल्सबाबत इफ्फीच्या ज्युरीनं केलेल्या वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया