Virender Sehwag Reaction On Adipurush Movie:  गेल्या काही दिवसांपासून आदिपुरुष (Adipurush) चित्रपटावर सोशल मीडियावर अनेक नेटकरी टीका करत आहेत. या चित्रपटामधील वीएफएक्स आणि कलाकारांच्या लूकला अनेक जण ट्रोल करत आहेत. या चित्रपटामधील डायलॉग्सवर अनेकांनी अक्षेप घेतला. आता या चित्रपटावर क्रिकेटर विरेंद्र सेहवागनं देखील टीका केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन विरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) आदिपुरुष चित्रपटाला ट्रोल केलं आहे.  


विरेंद्र सेहवागची पोस्ट


विरेंद्र सेहवागनं आदिपुरुष चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ट्वीटमध्ये लिहिलं, 'आदिपुरुष पाहिल्यावर कळालं कटप्पानं बाहुबलीला का मारलं होतं.' विरेंद्र सेहवागच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


विरेंद्र सेहवागनं आदिपुरुष चित्रपटाबद्दल शेअर केलेल्या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. विरेंद्र सेहवागच्या पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली,  'विरेंद्रनं शेअर केलेल्या पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, कट्टपा हा आदिपुरुष पाहिल्यानंतर बाहुबलीला पुन्हा शोधत आहे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'क्लासिक ड्राइव्ह'






विरेंद्र सेहवाग हा सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करतो. त्याला इन्स्टाग्रामवर 7 मिलियनपेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. विरेंद्र सेहवागचे चाहते त्याच्या पोस्टला लाईक्स आणि कमेंट्स करतात. त्यानं पठाण या चित्रपटाबाबत देखील त्यानं एक पोस्ट शेअर केली होती. 'पठाण पाहून मजा आली. फुल मस्ती, टाईमपास' अशी पोस्ट विरेंद्रनं शेअर केली होती. 


अभिनेता प्रभासनं आदिपुरुष या चित्रपटात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारली 'आहे तर अभिनेत्री कृती सेनननं या चित्रपटात सीता ही भूमिका साकारली आहे.  अभिनेता देवदत्त नागेनं या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊतनं केलं आहे. आदिपुरुष हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला. आदिपुरुष चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.  या चित्रपटामधील गाण्यांचे अनेक जण कौतुक करत आहेत. 


महत्वाच्या इतर बातम्या :


Pathan: क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं 'पठाण' पाहिल्यानंतर दिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'टाईमपास..."