Ram Charan-Upasana Kamineni baby daughter welcome : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आणि उपासना कमिनेनी (Upasana Kamineni) सध्या चर्चेत आहेत. नुकतचं त्यांना कन्यारत्न झालं असून अभिनेत्याने मोठ्या दिमाखात लेकीचा गृहप्रवेश केला आहे. तर दुसरीकडे उपासनाने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. 


राम चरण आणि उपासना लग्नाच्या 11 वर्षांनंतर 20 जून 2023 रोजी आई-बाबा झाले आहेत. आता उपासनाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ती घरी आली आहे. त्यांनंतर आता तिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तसेच लाडक्या लेकीची पहिली झलकदेखील शेअर केली आहे. 


राम चरणने लेकीचं केलं दिमाखात स्वागत


सुपरस्टार राम चरणची पत्नी उपासनाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जोडप्याने लेकीचं दिमाखात स्वागत केलेलं पाहायला मिळत आहे. लेकीच्या स्वागतासाठी त्यांनी खास सजावट केली होती. फोटो शेअर करत उपासनाने लिहिलं आहे,"आमच्या गोंडस, गोड परीचं प्रेमळ स्वागत झालं असून तुमच्या प्रेमाने मी भारावून गेले आहे. तुमचं प्रेम आणि आर्शीवादासाठी खूप खूप आभार".  






राम चरण, उपासना आणि त्यांच्या छोट्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये उपासनाकडे त्यांची मुलगी आणि राम चरणने त्यांच्या पाळलेल्या कुत्र्याला कडेवर घेतलेलं दिसत आहे. या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीदेखील कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रकुल प्रीत सिंहने कमेंट केली आहे की,"उप्सी अभिनंदन... देव तिला जगातील सर्व आनंद आणि प्रेम देवो". तर ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रानेदेखील उपासनाला आई झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. 


लग्नाच्या 11 वर्षांनंतर आई-बाबा झाले राम चरण आणि उपासना


राम चरण आणि उपासना लग्नाच्या 11 वर्षांनंतर आई-बाबा झाले आहेत. बाळाच्या येण्याने आता दोघंही आनंदी आहेत. लाडक्या लेकीसोबतचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायकल होत आहे. तर दुसरीकडे हैदराबादमध्ये राहणारा राम चरण आता मुंबईत घर घेणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.


संबंधित बातम्या


Ram Charan - Upasana : लेकीला कुशीत घेऊन रुग्णालयातून बाहेर पडला राम चरण; उपासनासोबतचा फोटो व्हायरल