मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माच्या 'परी' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. सिनेमाचं प्रमोशनही जोरदार सुरु आहे. त्यातच आता विराट कोहलीने 'परी' चित्रपट पाहिल्यानंतर ट्विटरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


होळीच्या मुहूर्तावर बॉक्सवर ऑफिसवर आज अनुष्का शर्माचा 'परी' रिलीज झाला आहे. प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला पती विराटने जबाबदारी उचलत 'परी'चं स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं होतं. चित्रपट पाहल्यानंतर भारावलेल्या विराटने ट्विटरवर अनुष्का आणि चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक केलं.

विराटने लिहिलं आहे की, "काल रात्री 'परी' पाहिला. माझ्या पत्नीची आतापर्यंतची ही सर्वोत्तम भूमिका आहे. मोठ्या काळानंतर एक चांगला चित्रपट पाहिला. सिनेमा पाहताना थोडा घाबरलो, पण मला तुझा अभिमान आहे अनुष्का शर्मा."


लग्नानंतर प्रदर्शित झालेला अनुष्का शर्माचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे विराटलाही या सिनेमाबाबत फारच उत्सुकता आहे. याआधी विराटने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर सातत्याने टीझर, ट्रेलर, स्क्रीमर शेअर करुन अनुष्काच्या 'परी'चं प्रमोशन केलं आहे.

प्रोषित रॉयने 'परी' सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून अनुष्का शर्मानेच याची निर्मिती केली आहे. एन10, फिलौरीनंतर अनुष्काचं प्रॉडक्शन असलेला तिसरा चित्रपट आहे. 'परी' हा शब्द उच्चारल्यावर आपल्या मनात आणि डोळ्यासमोर सुंदर परीचं चित्र समोर येतं, पण ही 'परी' थोडी भयानक आहे.

संबंधित बातम्या

डोळ्यात रक्त, गळ्यावर जखमांच्या खुणा, 'परी'चा टीझर रिलीज

अनुष्का शर्माच्या 'परी'चा झोप उडवणारा टीझर

अनुष्का शर्माच्या ‘परी’चा स्क्रीमर रिलीज