अनुष्का शर्माच्या ‘परी’चा स्क्रीमर रिलीज
आगामी ‘परी’ सिनेमासह ‘झिरो’ सिनेमातही अनुष्का दिसणार आहे. ‘झिरो’मध्ये शाहरुख आणि कतरिना कैफसोबत अनुष्का काम करणार आहे.
Continues below advertisement
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या आगामी ‘परी’ सिनेमाचं प्रमोशन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. पोस्टर, टीझर, ट्रेलरनंतर आता स्क्रीमर रिलीज करण्यात आला आहे.
काहीसा घाबरवणारा हा स्क्रीमर आहे. भिंतीवर सावली दिसते आणि बाथटबमध्ये प्रेग्नंट महिला झोपली आहे, असे या स्क्रीमरमध्ये दिसते आहे. महिलेच्या अभिनयावरुन सिनेमातील भितीदायक कथेची कल्पना करता येऊ शकते.
अनुष्का शर्माचा ‘परी’मधील लूक याआधीच रिलीज झाला आहे. अनुष्का पहिल्यांदाच अशा भितीदायक लूकमध्ये दिसणार असल्याने सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच, लग्नानंतर प्रदर्शित होणारा अनुष्का शर्माचा हा पहिलाच सिनेमा असेल.
आगामी ‘परी’ सिनेमासह ‘झिरो’ सिनेमातही अनुष्का दिसणार आहे. ‘झिरो’मध्ये शाहरुख आणि कतरिना कैफसोबत अनुष्का काम करणार आहे. ‘जब तक है जान’नंतर अनुष्का, शाहरुख आणि कतरिना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे.
दरम्यान, 'परी' सिनेमा उद्या म्हणजे 2 मार्चला रिलीज होणार आहे.
पाहा ‘परी’चा स्क्रीमर :
Continues below advertisement