मुंबई: सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी काला या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत अभिनेते नाना पाटेकर यांचीही प्रमुख भूमिका आहे.

यूट्यूबवर गुरुवारी रिलीज झालेल्या या टीझरला अल्पावधीतच लाखो हिट्स मिळाल्या आहेत. तामीळ टीझर शुक्रवारी सकाळी दहापर्यंत जवळपास 21 लाख लोकांनी पाहिला.

दुसरीकडे हिंदी टीझरला म्हणावा तितका प्रतिसाद नाही. कारण तामीळच्या तुलनेत हिंदी टीझर पाहणाऱ्यांची संख्या ही खूपच कमी म्हणजे केवळ दहा हजारांच्या घरात आहे.

पी ए रंजीत यांनी काला सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. रजनीकांत यांनी ‘काला’ची भूमिका साकारली आहे. काला तिरुनेलवेली (तमीळनाडू) वरुन मुंबईला येतो. मुंबईतील धारावीत येऊन तो पॉवरफूल डॉन बनतो, असं या सिनेमाचं कथानक आहे.

या टीझरची सुरुवात नाना पाटेकर यांच्या डायलॉगने होते, यामध्ये ते विचारतात, “ये काला कैसा नाम है रे?”

या सिनेमात हुमा कुरेशी, संपथ राज, सयाजी शिंदे यासारखी स्टारकास्ट आहे.

VIDEO: Kaala (Hindi) - Official Teaser