Virat Kohli Anushka Sharma : क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. 15 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी आपल्या दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं आहे. पण बाळाच्या जन्माच्या पाच दिवसांनी 20 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली.
विराट-अनुष्काने आपल्या धाकट्या मुलाचं नाव 'अकाय' (Akaay) असं ठेवलं आहे. त्यामुळे आता 'अकाय' विराट की अनुष्का सारखा दिसतो हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. तसेच बाळाची आणि बाळाच्या आईची तब्येत कशी आहे हे जाणून घेण्यासदेखील ते उत्सुक आहेत.
अनुष्काने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रकृती ठिक असल्याचं म्हटलं आहे. विरुष्काला पुत्ररत्न प्राप्त झाल्याने एकीकडे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे काही चाहते मात्र पाच दिवसांनी गुडन्यूज शेअर केल्याने नाराज झाले आहेत.
विरुष्काची पोस्ट काय? (Virat Kohli Anushka Sharma Post)
विरुष्काने लिहिलं आहे,"आम्हाला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की,15 फेब्रुवारी 2024 रोजी आम्ही आमच्या दुसऱ्या बाळाचं अर्थात वामिकाचा लहान भाऊ 'अकाय'चं स्वागत केलं आहे. आमच्या आयुष्यातील या गोड क्षणादरम्यान आम्हाला तुमच्या शुभेच्छा हव्या आहेत. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा. प्रेम आणि कृतज्ञता".
'अकाय'चा अर्थ काय? (Akaay Meaning)
विरुष्काने 'अकाय' हे नाव खूप विचार करुन ठेवलं आहे. हिंदी शब्दकोशानुसार, 'अकाय' म्हणजे 'निराकार'. कोणताही आकार, रूप नसलेल्याला निराकार म्हणटलं जातं. 'अकाय'चा एक अर्थ चंद्राचा प्रकाश असाही होतो. एकंदरीतच विरुष्काचं आयुष्य प्रकाशमय करणारा 'अकाय' आहे.
विराट आणि अनुष्काने 11 जानेवारी 2021 रोजी वामिकाला जन्म दिला होता. आता विरुष्का दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. 15 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी त्यांच्या दुसऱ्या बाळाचं 'अकाय'चं (Akaay) स्वागत केलं आहे.
विराट-अनुष्काची 'प्यारवाली लव्हस्टोरी'
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची पहिली भेट 2013 मध्ये एका शॅम्पूच्या जाहिरातीदरम्यान झाली होती. विराट ज्यावेळी अनुष्काला पहिल्यांदा भेटला त्यावेळी तो थोडा घाबरलेला होता. पहिल्याच भेटीत विराटच्या एका वाक्यामुळे अनुष्का संतापली होती. पण पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. लग्नाआधी अनेक वर्षे ते एकमेकांना डेट करत होते.
संबंधित बातम्या