मिलान (इटली) : 2017 मधील सर्वात चर्चेत असलेलं कपल अखेर काल (11.12. 2017) लग्नाच्या बेडीत अडकले. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा लग्नसोहळा इटलीत पार पडला. इटलीतील मिलानपासून 34 किमी दूर सिएनामधील Borgo Finocchieto रिसॉर्टमध्ये लग्नाच्या विधी पार पडल्या. त्यांच्या या लग्नसोहळ्याला अगदी जवळचे नातेवाईक आणि मित्रांना निमंत्रण देण्यात आलं होतं.


विराट आणि अनुष्काचं लग्न ज्या रिसॉर्टमध्ये झालं तिथं एबीपीची टीम देखील पोहचली. त्या जागेचे काही खास फोटोही एबीपी माझाला मिळाले आहेत.

लग्नानंतर विराट आणि अनुष्का हनीमूनसाठी रोमला जाणार आहेत. त्यानंतर 21 डिसेंबर रिसेप्शन असल्यानं ते त्याआधी भारतात परतील. त्यानंतर मुंबई आणि दिल्लीत दोन ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी होणार आहे. ज्यामध्ये अनेक बडे सेलिब्रिटी सहभागी होती.


ऐतिहासिक रिसॉर्टमध्ये विरानुष्काचं लग्न...

विराट आणि अनुष्काचं लग्न इटलीतील Borgo Finocchieto रिसॉर्टमध्ये पार पडलं. हा रिसॉर्ट प्रचंड महागडं आणि ऐतिहासिक आहे. या रिसॉर्टचा इतिहास तब्बल 800 वर्ष जुनं आहे. Tuscanyच्या सुंदर डोंगररांगांमध्ये बनवण्यात आलेलं हे रिसॉर्ट एअरपोर्टपासून अवघ्या 1 तासाच्या अंतरावर आहे.



या रिसॉर्टमध्ये केवळ 5 सुइट्स, 5 व्हिला आणि फक्त 22 खोल्या आहेत. ज्यामध्ये जवळजवळ 44 लोक राहू शकतात. याशिवाय स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट आणि स्पा सारख्या इतरही गोष्टी आहेत. फोर्ब्सच्या ताज्या रिपोर्टनुसार, हे रिसॉर्ट जगातील दुसरं महागडं हॉलिडे डेस्टिनेशन आहे.



जिथे तुम्हाला एका दिवसासाठी देखील बरेच पैसे मोजावे लागतात. एका दिवसासाठी तब्बल 15,000 डॉलर मोजावे लागतात. येथील खास वातावरणामुळे डिसेंबरमध्ये या ठिकाणाला बरेच पर्यटक पसंती देतात. याच वर्षी मे महिन्यात अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आपल्या पत्नीसोबत गेले होते.



VIDEO :


संबंधित बातम्या :

विराट-अनुष्काच्या लग्न आणि हळदीचा व्हिडिओ

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात!

विराट-अनुष्काच्या लग्नाचा पहिला फोटो!

दिल्लीत 21, तर मुंबईत 26 तारखेला 'विरानुष्का'च्या लग्नाचं रिसेप्शन

रब ने बना दी जोडी... 'विरानुष्का'ची लव्हस्टोरी

क्रिकेट आणि बॉलिवूडमधल्या नात्याची परंपरा