रोम : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. इटलीमध्ये हा विवाह सोहळा होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. अखेर इटलीमधीलच एका रिसॉर्टमध्येच हा सोहळा झाला.


विराट-अनुष्काच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. अखेर लग्नाची बातमीही अचानक येऊन धडकली. त्यानंतर काही वेळातच लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. दोघांनी स्वतः लग्नाचे फोटो शेअर केले. आता हळद आणि लग्नाचा व्हिडिओही समोर आला आहे.

पाहा लग्नाचा व्हिडिओ



हळदीचा व्हिडिओ