VIDEO : विराट-अनुष्काचं जिममध्ये एकत्र वर्कआऊट
एबीपी माझा वेब टीम | 07 Jun 2018 11:24 AM (IST)
विराट आणि अनुष्का सोबतच जिममध्ये दिसत असून, अनुष्काने वर्कआऊटला सुरुवात केल्यानंतर विराटने व्हिडीओ शूट केला. यावेळी विराटने अनुष्काची स्तुतीही केली.
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी लग्नानंतर खूप कमीवेळा कॅमेऱ्यासमोर एकत्र दिसली. विराट क्रिकेटमध्ये, तर अनुष्का सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असते. मात्र आता या दोघांनी एकत्र जिम करतानाचा व्हिडीओ शूट केला असून, विराटने तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. विराट आणि अनुष्का सोबतच जिममध्ये दिसत असून, अनुष्काने वर्कआऊटला सुरुवात केल्यानंतर विराटने व्हिडीओ शूट केला. यावेळी विराटने अनुष्काची स्तुतीही केली. विराट अनेकदा अनुष्कासोबत व्हिडीओ आणि फोटो इन्स्टाग्रमावर शेअर करत असतो. आयपीएल संपल्यानंतर विराट सध्या विश्रांती घेतो आहे. मात्र अनुष्का सध्या तिच्या सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असते. सध्या वरुण धवनसोबत ‘साथ सुई धागा’ आणि शाहरुखसोबत ‘झिरो’ सिनेमात अनुष्का काम करत आहे. पाहा व्हिडीओ :