धनुष इंजिनिअर रघुवरनची भूमिका साकारत आहे, तर काजोल एका कॉर्पोरेट कंपनीची मालकीण वसुंधराच्या भूमिकेत आहे. काजोल खलनायिकेच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.
दोन दशकांनंतर काजोल टॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. 1997 मध्ये अरविंद स्वामीच्या 'मिनसारा कनवू'मध्ये यापूर्वी ती झळकली होती.
VIDEO : काजोल-धनुषच्या 'व्हीआयपी 2'चा टीझर रिलीज
चित्रपटाची कथा आणि संवाद धनुषचे असून सौंदर्या रजनीकांतने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 2014 मध्ये आलेल्या व्हीआयपी चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. 28 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पाहा व्हिडिओ :