मुंबई : सलमान खानच्या 'ट्यूबलाईट' सिनेमा बॉक्स ऑफिसवरची कमाई फारशी चांगली झालेली नाही. सिनेमा रविवारी चांगली कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण सिनेमाने सपशेल निराशा केली.


'ट्यूबलाईट'ने शुक्रवारी 21.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. शनिवारी सिनेमाची कमाई 21.17 कोटी होती. तर रविवारी सिनेमाला जवळपास 22 कोटी कोटी कमावता आले. त्यामुळे सलमानच्या ट्यूबलाईटने तीन दिवसात सुमारे 64 कोटी कमावले.

कमाईच्या बाबतीत 'ट्यूबलाईट' बाहुबलीच्या बराच मागे आहे. 'बाहुबली 2'च्या हिंदी व्हर्जनने पहिल्याच आठवड्यात 128 कोटी रुपये कमावले होते. उलट सलमान खानच्या सिनेमाला मोठा विकेंड मिळाला आहे, कारण आज ईदची सुट्टी आहे.

REVIEW: न पेटलेली 'ट्युबलाईट'!


'प्रेम रतन धन पायो' हा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा सलमान खानचा चित्रपट होता. या सिनेमाने पहिल्या दिवशी 40.35 कोटी कमावले होते. तर पुढचा सिनेमा 'सुलतान'ने पहिल्या दिवशी 36.54 कोटींची कमाई केली होती.

'ट्यूबलाईट' एकूण 5400 थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला भारताबाहेर सुमारे 1000 थिएटर तर भारतात 4400 स्क्रीन्स मिळाल्या होत्या.

भारत आणि चीन युद्धादरम्यानच्या या कहाणीत सलमान खान, लक्ष्मण सिंह बिष्टच्या भूमिकेत आहे. तर खऱ्या आयुष्यातील त्याचा भाऊ सोहेल खानने भरत सिंह बिष्टची भूमिका साकारली आहे.

संबंधित बातम्या

'ट्यूबलाईट'ची पहिल्या दिवसाची कमाई किती?

एक वर्षाने सलमानचं दर्शन, 5 हजार 550 स्क्रीन्सवर ट्यूबलाईटचा उजेड

सिनेमेनिया : भाईजानचा 'ट्यूबलाईट' नक्कीच लख्ख प्रकाशणार!