Lalit Modi Sushmita Wedding : अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि IPL चे पहिले फाऊंडर ललित मोदी (Lalit Modi) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. सुष्मिता ललित मोदींच्या प्रेमात पडल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. पण आता सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड आणि लोकप्रिय दिग्दर्शक विक्रम भट्टने (Vikram Bhatt) सुष्मिताला पाठिंबा दिला आहे. 


एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत विक्रम भट्ट म्हणाला,"सुष्मिता सेनने कोणासोबत आयुष्य घालावावं हा तिचा निर्णय आहे. तिच्या आयुष्यात डोकावण्याचा इतरांनी प्रयत्न करू नये. सुष्मिता सेन सध्या तिच्या आयुष्यात आनंदी आहे. त्यामुळे इतरांनी प्रश्न उपस्थित करू नयेत."


विक्रम भट्ट पुढे म्हणाला, सुष्मिता सेन स्वत:च्या पायावर उभी आहे. तिच्या दोन मुलींचा सांभाळ करण्यासाठी तिला कधीच कोणाची गरज भासली नाही. सुष्मिता सेन आणि ललित मोदींच्या नात्यावर नेटकरी उगाच प्रश्न उपस्थित करत आहेत. 


ललित मोदींच्या पोस्टनंतर सुष्मिताची पहिली रिअॅक्शन काय होती? 


सुष्मिताने लिहिलं होतं, मी सध्या आनंदी आहे. माझा लग्न, साखरपुडा झालेला नाही. सध्या मी प्रेमळ माणसांच्या सानिध्यात आहे. माझे फोटो शेअर केल्याबद्दल आभार आणि ज्यांनी फोटो शेअर केला नाही त्यांच्यासाठी 'None Of Your Business'. सुष्मिताच्या या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले होते. 






संबंधित बातम्या


Sushmita Sen First Reaction : ललित मोदींच्या पोस्टनंतर सुष्मिताची पहिली रिअॅक्शन; म्हणाली...


Rajeev Sen On Sushmita Sen-Lalit Modi : बहीण ललित मोदींना डेट करतेय! सुष्मिताच्या भावानं सोडलं मौन; म्हणाला, 'मी काही बोलण्याआधी...'