Rajeev Sen On Sushmita Sen-Lalit Modi : आयपीएलचे (IPL) पहिले फाऊंडर ललित मोदी (Lalit Modi) यांनी एक ट्वीट शेअर करुन अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतच्या (Sushmita Sen) नात्याची घोषणा केली. सुष्मिता आणि ललित हे एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्या डेटिंगवर अनेकांनी रिअॅक्शन दिल्या आहेत. आता सुष्मिताचा भाऊ राजीव सेननं (Rajeev Sen) ललित आणि सुष्मिता यांच्या रिलेशनशिपवर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला राजीव?
एका मुलाखतीमध्ये राजीवला ललित मोदी आणि सुष्मिता यांच्या नात्याबाबत विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला की,'मी खुश आहे आणि हैराण देखील मी काही बोलण्याआघी माझ्या बहिणीसोबत चर्चा करेन. मला याबाबत काहीच माहित नाही. माझी बहिणीनं याबाबत कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे मी यावर काही कमेंट करणार नाही. '
ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या वयामध्ये 10 वर्षाचे अतंर आहे. ललित हे 56 वर्षाचे आहेत. तर सुष्मिता ही 46 वर्षांची आहे. ललित मोदी यांनी ट्वीट शेअर करुन सुष्मिता आणि त्यांच्या नात्याची माहिती नेटकऱ्यांना दिली.पहिल्या ट्विटमध्ये सुष्मिता सेन हिचा ‘बेटरहाफ’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर दुसऱ्या अन्य एका ट्विटमध्ये आम्ही अद्याप लग्न केले नाही. आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. लवकरच लग्न करु असे म्हटलेय.
ललित मोदी यांचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
ललित मोदी यांचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा क्रिडा पत्रकार बोरिया मजूनदार यांच्या 'मॅवरिक कमिश्नर: द आयपीएल-ललित मोदी सागा' या पुस्तकावर आधारित आहे. ललित मोदी यांच्या प्रेमाचा नवा अध्याय सुरू झाल्याने प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता आहे.
ललित मोदी आणि मीनल यांच्या प्रेमाला ळे आता लत्यांच्या कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळेच त्यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करण्यात निर्णय घेतला. 17 ऑक्टोबर 1991 रोजी ते लग्नबंधनात अडकले. ललित मोदी आणि मीनल यांनी रुचिर नावाचा मुलगा आहे. तर रुचिर यांना आलिया नावाची एक मुलगी आहे. मीनल यांचे 2018 मध्ये निधन झाले आहे. त्यामुलित मोदी सुष्मितासोबत लवकरच लग्नबंधनात अडकू शकतात.