Vijay Sethupathi: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपतीच्या (Vijay Sethupathi)  विदुथलई (Viduthalai) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना घडली. शूटिंगदरम्यान 54 वर्षीय स्टंटमॅन सुरेश हा एक स्टंट परफॉर्म करत होता. तेव्हा अचानक एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत स्टंटमॅन सुरेशचा मृत्यू झाला आहे. 


काय घडलं? 
विदुथलई चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही घटना दुर्घटना घडली. वंडलूरमध्ये विदुथलई चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. सुरेश हा मुख्य स्टंट दिग्दर्शकासोबत असिस्टंट म्हणून काम करत होता. चित्रपटाच्या शूटिंगसाठी भव्य सेट उभारण्यात आला होता. सुरेश हा त्यांच्या सहकाऱ्यांसह तेथे उपस्थित होते. त्याला दोरीने बांधून उडी मारण्याचा स्टंट करायचा होता. रिपोर्टनुसार, सुरेशला दोरीच्या साहाय्याने क्रेनला बांधण्यात आले. सीनचे शूटिंग सुरू होताच ती दोरी तुटली. त्यानंतर सुरेश हा 20 फूट उंचीवरून खाली पडला. सुरेशला लगेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 


सेटवर घडलेला संपूर्ण घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सुरेश 25 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत होता. विदुथलई चित्रपटाचे शूटिंग दोन भागात होणार होते, मात्र या अपघातामुळे शूटिंग रखडले आहे. विदुथलई या चित्रपटात विजय सेतुपतीसोबतच अभिनेता प्रकाश राज, गौतम मेनन, किशोर, भावानी श्री, राजीव मेनन, चेतन हे देखीलव प्रमुख भूमिका साकारणार आहेत. विदुथलई या चित्रपटातील काही सीन्स सत्यमंगलमच्या जंगलात शूट करण्यात आली आहेत. 


काही दिवसांपूर्वी विजय सेतुपतीचा डीएसपी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. विजय सेतुपतीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. 






वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Vijay Sethupathi Birthday : सेल्समन ते अभिनेता, जाणून घ्या दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीचा प्रवास