December Release Films : वर्षाचा शेवटचा महिना अर्थात डिसेंबर (December) खूपच मनोरंजनात्मक असणार आहे. या महिन्यात अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. प्रेक्षकांना सस्पेन्स, थ्रिलर आणि अॅक्शनचा तडका असणारे सिनेमे पाहायला मिळणार आहेत. यात कार्तिक आर्यनच्या 'फ्रेडी'पासून विकी कौशलच्या 'गोविंदा नाम मेरा' सारख्या अनेक सिनेमांचा समावेश आहे.

Continues below advertisement

फ्रेडी (Freddy)कुठे पाहू शकता? डिज्नी प्लस हॉटस्टार 

कार्तिक आर्यन आणि अलायाचा 'फ्रेडी' हा सिनेमा प्रेक्षक डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहू शकतात. या सिनेमात कार्तिक एका डेंटिस्टच्या भूमिकेत आहे. विनोदी आणि हलक्या-फुलक्या भूमिका करणाऱ्या कार्तिकचा एक वेगळा अंदाज या सिनेमात दिसणार आहे. 

Continues below advertisement

कालाकुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स

काला ही एक उत्कृष्ट गायिका आहे. या सिनेमात तृप्ती डिमरी, स्वस्तिका मुखर्जी आणि बाबिल खान महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. इरफान खानला मुलगा बाबिल खान या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. हा सिनेमा प्रेक्षक नेटफ्लिक्सवर पाहू शकतात. 

अॅन अॅक्शन हिरोकुठे पाहू शकता? सिनेमागृह

'अॅन अॅक्शन हिरो' हा सिनेमा प्रेक्षक सिनेमागृहात पाहू शकतात. या सिनेमात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत असून पहिल्यांदाच अॅक्शनमोडमध्ये दिसत आहे. 

इंडिया लॉकडाउनकुठे पाहू शकता? झी 5

कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याकाळात सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. या लॉकडाऊनवर बेतलेला 'इंडिया लॉकडाउन' हा सिनेमा आहे. मधुर भंडारकरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात श्वेता बसू प्रसाद, अहाना कुमरा, प्रतीक बब्बर, सई ताम्हणकर आणि प्रकाश बेलावाडी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा 'झी 5'वर रिलीज झाला आहे.

सलाम वेंकी (Salaam Venky)कुठे पाहू शकता? सिनेमागृह

'सलाम वेंकी' हा सिनेमा एका आई आणि मुलावर आधारित आहे. सत्यघटनेवर आधारित हा सिनेमा प्रेक्षक 9 डिसेंबरपासून सिनेमागृहात पाहू शकतात. 

कैटकुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स

एका निरपराध माणसावर भाष्य करणारा कैट हा सिनेमा आहे. या सिनेमात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना 9 डिसेंबरपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. 

सर्कसकुठे पाहू शकता? सिनेमागृह

'सर्कस' या बहुचर्चित सिनेमात जॅकलिन फर्नांडीस, पूजा हेगडे, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर, मुकेश तिवारी, सिद्धार्थ जाधव आणि वरुण शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात रणवीर दुहेरी भूमिकेत आहे. 23 डिसेंबरला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

गोविंदा नाम मेराकुठे पाहू शकता? डिज्नी प्लस हॉटस्टार 

'गोविंदा नाम मेरा' या सिनेमात विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. 16 डिसेंबरला हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

ब्लरकुठे पाहू शकता? झी 5

'ब्लर' हा रहस्यमय सिनेमा आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. 9 डिसेंबरपासून हा सिनेमा प्रेक्षक 'झी 5'वर पाहू शकतात. 

संबंधित बातम्या

Salaam Venky: आई आणि मुलाच्या नात्याची कथा; काजोलच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज