Hansika Motwani Wedding : अभिनेत्री हंसिका मोटवानी (Hansika Motwani) सध्या लग्नामुळे चर्चेत आहे. ती नुकतीच प्रियकर सोहेल कथुरियासोबत (Sohael Khatruiya) लग्नबंधनात अडकली आहे. राजस्थानमधील मुंडोता फोर्ट आणि पॅलेसमध्ये सिंधी रितीरिवाजानुसार तिने लग्न केलं आहे. 


हंसिका-सोहेलच्या मेहंदी, संगीत आणि हळदीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  450 वर्ष जुन्या किल्ल्यात हंसिकाचा लग्नसोहळा पार पडला आहे. कुटुंबिय आणि जवळच्या मित्र-मंडळींनी तिच्या लग्नसोहळ्यात उपस्थित होते. 


हंसिकाचं डेस्टिनेशन वेडिंग


हंसिका आणि सोहेलने सप्तपदी घेतलेला किल्ला 450 वर्ष जुना आहे. हंसिकाच्या लग्नासाठी किल्ला खास सजावण्यात आला होता. केवळ आतूनच नव्हे तर बाहेरूनही हा किल्ला पाहण्यासारखा आहे. हंसिका आणि सोहेलने लग्नाचा निर्णय घेतला तेव्हाच त्यांनी या पॅलेसवर डेस्टिनेशन वेडिंग करण्याचं ठरवलं होतं.






हंसिका मोटवानी एक लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. बालकलाकार म्हणून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. 'शक लाका बूम बूम', 'सास भी कभी बहू थी' आणि 'सोन परी' यांसारख्या गाजलेल्या मालिकांत हंसिकाने काम केलं आहे. या मालिकांच्या माध्यमातून हंसिका घराघरांत पोहोचली आहे. 'कोई मिल गया', 'आपका सरूर' आणि 'मनी है तो हनी' यांसारख्या बॉलिवूड सिनेमांत तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.


संबंधित बातम्या


Hansika Motwani Wedding : हंसिका मोटवानी आज घेणार सात फेरे; संगीत कार्यक्रमाचा व्हिडीओ होतोय व्हायरल