Tamil Actor Jayam Ravi Divorce Rumors:   तमिळ सिनेसृष्टीतला लोकप्रिय अभिनेता जयम रवीच्या (Jayam Ravi) संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. जमय रवीने ऐश्वर्या राय (Aishwarya Rai), कंगना रणौत (Kangana Ranaut) यांसारख्या अनेक बड्या बॉलीवूड कलाकारांसोबत काम केलं आहे. पण आता हा अभिनेता त्याच्या पत्नीपासून वेगळं होणार असल्याची बातमी सध्या समोर आली आहे.  काही वर्षांपूर्वीच अभिनेत्याने लग्न केलं, पण आता तो घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जातंय. 


जयम रवी हा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जरी फार बोलत नसला तरी त्याच्या सोशल मीडियावर तो त्याच्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतो. आता काही रिपोर्ट्सकडून असा दावा करण्यात येत आहे की, आरतीने जमयसोबतचे तिचे सोशल मीडियावरुन सगळे फोटो काढून टाकले आहेत. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटासंदर्भातले वृत्त सध्या समोर येत आहे. 


जयम आणि आरतीच्या घटस्फोटाच्या केवळ अफवा?


जयमची पत्नी आरती हिच्या सोशल मीडियावर जवळपास 160 पोस्ट आहेत. पण यामध्ये तिचा आणि जयमचा एकत्रित एकही फोटो नाही. त्यामुळे त्यांच्यात अलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलंय. पण आरती अजूनही जयमला सोशल मीडियावर फॉलो करते, इतकच नाही तर तिने तिच्या सोशल मीडियावर जमयचचं नाव लावलं आहे. पण सध्या सुरु असलेल्या चर्चांना अद्याप या दोघांपैकी कुणीही भाष्य केलेलं नाहीये. 


दोन वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न


वृत्तांनुसार, जयम आणि आरती जेव्हा स्कॉटलंडमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा त्यांच्यात जवळीक वाढली होती. दोघेही एकमेकांना दोन वर्षांपासून ओळखत होते. लवकरच त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी कुटुंबाला एकमेकांबद्दल सांगितले. घरी बोलून दोघांनी 2009 मध्ये लग्न केले. यानंतर दोघेही आरव आणि अयान या दोन मुलांचे पालक झाले.                                                    






ही बातमी वाचा : 


Purva Kaushik : साडी आणि हिल्समध्ये शिवाची जबरदस्त फाईटिंग, अभिनेत्री पूर्वा कौशिक म्हणाली, असं काहीतरी करणं...