Vijay Deverakonda : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आज 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. विजयने वाढदिवसानिमित्त खास त्याच्या आगामी 'लायगर' (Liger) सिनेमाचे पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केले आहे. 


विजयने लायगर सिनेमाचे पोस्टर शेअर करत एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे लायगर सिनेमाची एक झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. हा सिनेमा 22 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.






विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात विजय देवरकोंडा अनन्या पांडेसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाध यांनी केले आहे. या सिनेमाचे मुंबई, अमेरिका, लॉस वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी शूटिंग झाले आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.


संबंधित बातम्या


Happy Birthday Vijay Deverakonda : कधी काळी घरभाड्यासाठी पैसे नव्हते, तरी पहिल्या पुरस्कारातून केले ‘हे’ सत्कार्य! जाणून घ्या अभिनेता विजय देवरकोंडाबद्दल...


PHOTO : पहिल्या फिल्म फेअर पुरस्काराचा लिलाव करून दान केले पैसे! वाचा विजय देवरकोंडाच्या खास गोष्टी...


Vijay Deverakonda : रश्मिकाशी लग्न करणार का? पाहा काय म्हणाला विजय देवरकोंडा...