Liger Ott Release: अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda)  आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday)  यांच्या लायगर या चित्रपटात लायगर  (Liger) हा चित्रपट 23 ऑगस्ट 2022 मध्ये रिलीज झाला. हा चित्रपट हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. या चित्रपटानं जवळपास 66 कोटींची कमाई केली. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? असा प्रश्न अनन्या आणि विजयच्या जाहत्यांना पडला असेल. जाणून घेऊयात लायगर या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत...


आज (22 सप्टेंबर) लायगर हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लायगरचं पोस्टर शेअर करुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा चित्रपट ओटीटीवर रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाचं हिंदी व्हर्जन ओटीटीवर कधी रिलीज होणार आहे? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 






लायगर हा चित्रपटाची निर्मिती 90 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली होती. पुरी जगन्नाथ, करण जोहर आणि चार्मे कौर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांच्यासोबतच रोनित रॉय, रम्या कृष्णन, मकरंद देशपांडे आणि विश रेड्डी या कलाकारांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे.  मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी 'लायगर' या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. आता ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल? या प्रश्नाचं लवकरच उत्तर मिळेल.


लायगरनंतर आता वियचा खुशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात विजयसोबतच सामंथा देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर अनन्या 'खो गये हम कहा' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विजय आणि अनन्याच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 


Vijay Deverakonda : लायगर फ्लॉप ठरल्यानंतर विजय देवरकोंडाचा मोठा निर्णय; मानधनातील सहा कोटी निर्मात्यांना करणार परत!