Vijay Antony Wife Fatima : तमिळ चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता विजय अँटोनीच्या  (Vijay Antony) लेकीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. विजय अँटोनीची मुलगी मीरा हिने 19 सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. मीराने वयाच्या 16 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.  मीराच्या निधनानंतर  विजय अँटोनीची पत्नी फातिमानं (Fatima) एक  ट्वीट शेअर केली आहे. या ट्वीटच्या माध्यमातून फातिमानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


फातिमाचं ट्वीट


फातिमानं ट्वीटमध्ये लिहिलं, "जर मला माहित असते की, तू फक्त 16 वर्षे जगणार आहेस, तर मी तुला माझ्या खूप जवळ ठेवले असते, तुला सूर्य चंद्र देखील दाखवले नसते, तुझ्या विचारांमध्ये मी बुडून मरत आहे, तुझ्याशिवाय जगू शकत नाही, बाबा आणि अम्माकडे परत ये. लारा तुझी वाट पाहत राहते, लव्ह यू थंगम"






विजय अँटोनीनं देखील मीराच्या निधनानंतर एक भावनिक पोस्ट शेअर करुन त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, "प्रिय लोकांनो, माझी मुलगी मीरा एक गोड आणि धाडसी मुलगी आहे. ती आता एका चांगल्या आणि शांत ठिकाणी आहे जिथे जात, धर्म, पैसा, मत्सर, वेदना, गरिबी आणि वैर नाही. ती अजूनही माझ्याशी बोलत आहे.मी तिच्यासोबतच हे जग सोडलं आहे. "






चेन्नईतील एका लोकप्रिय महाविद्यालयात  विजयची मुलगी शिक्षण घेत होती. मीराने 19 सप्टेंबर रोजी पहाटे 3 च्या सुमारास चेन्नईतील अलवरपेट येथील राहत्या घरी गळफास घेतला. मीराच्या निधनानं विजय अँटोनी आणि  फातिमा  यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.मीरा ही विजयची मोठी मुलगी होती.  विजय अँटोनीला लारा नावाची आणखी एक मुलगी आहे. 


संबंधित बातम्या:


Vijay Antony: "जात, धर्म, पैसा, वेदना..."; लेकीच्या निधनानंतर अभिनेता विजय अँटोनीनं व्यक्त केल्या भावना