Vijay Antony Statement After Meera Demise: तमिळ चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता आणि संगीतकार विजय अँटोनी (Vijay Antony) याच्यावर काही दिवसांपूर्वी दु:खाचा डोंगर कोसळला. विजय अँटोनीची मुलगी मीरा हिने 19 सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. मीराने वयाच्या 16 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आता लेकीच्या निधनानंतर विजय अँटनीनं भावूक पोस्ट शेअर करुन त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.  


 
विजय अँटोनीची पोस्ट


विजय अँटोनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, "प्रिय लोकांनो, माझी मुलगी मीरा एक गोड आणि धाडसी मुलगी आहे. ती आता एका चांगल्या आणि शांत ठिकाणी आहे जिथे जात, धर्म, पैसा, मत्सर, वेदना, गरिबी आणि वैर नाही. ती अजूनही माझ्याशी बोलत आहे. मी तिच्यासोबतच हे जग सोडलं आहे. आता मी तिच्यासोबत वेळ घालवायला सुरुवात केली आहे. मी आता तिच्या वतीने चांगली कामे करेन."


विजय अँटोनी त्याच्या पोस्टला कॅप्शन दिलं, 'तू आमचा एक भाग आहेस, तुझ्या वेदना आम्ही समजू शकतो. तुझ्या स्टाँग हृदयाची आम्हाला जाणीव आहे, तुझ्यावर आम्ही नेहमीच प्रेम करतो.'  विजय अँटोनीच्या पोस्टला कमेंट करुन नेटकऱ्यांनी मीराला श्रद्धांजली वाहिली आहे.






विजय अँटोनीची मुलगी मीरा ही बारावीत होती. चेन्नईतील एका लोकप्रिय महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती. मीराने 19 सप्टेंबर रोजी पहाटे 3 च्या सुमारास चेन्नईतील अलवरपेट येथील राहत्या घरी गळफास घेतला.  मीरा अँटोलीच्या निधनाने मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला.मीरा ही विजयची मोठी मुलगी होती.  विजय अँटोनीला लारा नावाची आणखी एक मुलगी आहे.  लहान वयात मीरा अशा कोणत्या तणावात होती? मीराने आयुष्याचा शेवट का केला?  असा प्रश्न मीराच्या निधनानंतर नेटकरी उपस्थित करत आहेत. विजयच्या पत्नीचे नाव फातिमा विजय अँटोनी आहे. 


विजय अँटोनीचे चित्रपट


विजय अँटोनीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यानं सलीम (2014) आणि पिचाईकरन (2016) या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या. तसेच त्याचा  'रथम' हा आगामी  चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  


संबंधित बातम्या:


लोकप्रिय अभिनेत्याच्या 16 वर्षीय मुलीची आत्महत्या; राहत्या घरातच संपवलं आयुष्य